सुका चारा पेटविल्याचा वाद उठला डॉक्टरच्या जीवावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेजारच्यांनी बाभळीच्या फांद्या पेटवून दिल्यामुळे गाईसाठी आणलेला सुक्या चाऱ्याने पेट घेतला. त्यामुळे जाब विचारण्यासाठी गेलेल्या जेष्ठ व्हेटरनरी डॉक्टरला चौघांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना कळस माळवाडीत जानेवारी २०२० मध्ये घडली होती. मात्र, मृत्यूचा अहवाल उशिरा आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

डॉ. भरत दिवेकर (वय ६५, रा. कळस, माळवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. राजेंद्र रामचंद्र दरेकर (वय ४८) , निखील बाळू सपकाळ (वय ३४) , यतीन बाळू सपकाळ (वय ३० सर्व रा. आळंदी रस्ता, कळस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी दरेकर (वय ५५, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

आळंदी रस्त्यावरील कळसमध्ये राहत असलेल्या शिवाजी यांनी त्यांच्या मोकळ्या जागेतील बाभळीच्या आणि उंबराच्या फांद्या तोडल्या होत्या. त्याचा राग आल्यामुळे आरोपी राजेंद्रने फांद्या पेटवून दिल्या होत्या. त्यामुळे शिवाजी यांनी गाईसाठी आणलेल्या सुक्या चाNयाने पेट घेतला. त्याचा जाब विचारण्यासाठी डॉ. भरत तेथे गेले. त्यावेळी आरोपींनी डॉ. भरत यांना शिवीगाळ करून लाकडी धोपाटन्याने मारहाण केली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. आरोपींच्या मारहाणीत व्हेटरनरी डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांनी दिली आहे.