भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाची सोमवारी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तसेच या कुत्र्यांचे पालनपोषण, आहार, संगोपन व लसीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित केली पाहिजे, असे मत नोंदवत न्यायालयाने याबाबतीत ‘द वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज’ या स्वयंसेवी संस्थेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. नवी मुंबईतील सीवूड्स इस्टेट्समधील सहा रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.