
शालिनी कृष्णा पै यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. एक्साईज आणि कस्टममधील सेवानिवृत्त अधिकारी कृष्णा पै यांच्या त्या अर्धांगिनी आणि बोरिवली येथील कलामहर्षी अॅड आर्ट्सचे संस्थापक उदय पै यांच्या त्या मातोश्री होत. प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शालिनी पै यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली.
































































