
सामना ऑनलाईन । मुंबई
शरद पवार हे देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी नेते आहे असे विकीपीडियामध्ये नमूद केले होते. त्यावरून मोठा गदारोळ झाला. हा वाद शमत नाही तोच शरद पवार हे भ्रष्टवादी पक्षाचे अध्यक्ष आहे असे विकीपीडियाच्या गुगलच्या पानावर नमूद करण्यात आले आहे.
शरद पवार हे देशातील सर्वात भ्रष्ट नेते आहेत, असे विकीपीडियात म्हटले होते. त्यावरून वाद होऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. हा वाद शमला नाही तोच शरद पवार हे नॅशनालिस्ट काँग्रेस च्या ऐवजी करप्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष असल्याची माहिती विकीपीडियाच्या गुगलच्या होम पेजवर म्हटले आहे. परंतु जेव्हा शरद पवारांचे विकीपीडियाचे पान उघडल्याल त्यात नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी असे म्हटले आहे. म्हणजेच गुगलच्या सुरूवातीच्या होमपेजवर पुन्हा कोणीतरी छेडखानी केल्याचे दिसत आहे.
या नोंदींच्या संपादनात अनेक अडचणी असल्याचे विकीपीडियाने म्हटले आहे, त्याबाबत वाचकांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
































































