गरज असेल तेथेच आघाडीचा निर्णय घ्या, शरद पवार यांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱया दहा महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 140पेक्षा अधिक नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिले. ज्या महानगरपालिकांवर भाजपचे प्राबल्य आहे, अशा ठिकाणी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेण्याबाबत मित्र पक्षांशी चर्चा करावी, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरच प्रामुख्याने चर्चा झाली. पालकमंत्री व संपर्पमंत्र्यांकडून त्यांच्या जिह्यातली राजकीय परिस्थिती शरद पवार यांनी जाणून घेतली. तसेच निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला.

शहरी भागावरही लक्ष द्या

संपर्पमंत्र्यांनी व पालकमंत्र्यांनी जिह्याच्या दौऱयावर जावे. कोरोनामुळे मेळावे आयोजित करू नयेत. मात्र पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संपका&त राहावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागाकडेही लक्ष द्या, अशी सूचना शरद पवार यांनी केली.

तर घाईघाईत निवडणुका नको

ज्या महानगरपालिकांवर भाजपचे प्राबल्य आहे, अशा ठिकाणी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेण्याबाबत मित्र पक्षांशी चर्चा केली जाणार आहे. तर काही ठिकाणी स्थानिक परिस्थिती बघून आघाडीचा निर्णय होईल. त्याबाबतचा सर्वस्वी निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार आहे. घाईगडबडीत निवडणुका घेणे योग्य ठरणार नाही. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत, अन्यथा मोठा फटका बसेल, असे मत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केले.

महामंडळांचे वाटप पंधरा दिवसांत

n महामंडळांच्या वाटपावर यावेळी चर्चा झाली. येत्या 15 दिवसांत महामंडळावरील नियुक्त्या करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
n बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री तसेच ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.