राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा जिह्यातील वाहनधारकांना टोलमाफीचा निर्णय आठ दिकसांमध्ये घ्याका, अन्यथा जिह्यातील टोलनाके उखडून टाकले जातील, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी आंदोलनप्रसंगी दिला.
आमदार शिंदे म्हणाले, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संसदेतील भाषणामध्ये साठ किलोमीटरच्या आतील टोल बंद केले जातील, असे सांगितले होते. त्याची अंमलबजावणी अद्यापि झालेली नाही. जिल्हावासीयांना टोल माफी करणार की नाही, याचा खुलासा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावा. टोलनाका परिसरात राहणाऱया जनतेला पासच्या नावाखाली लुटले जात आहे.
स्थानिकांना टोलमाफी देण्याऐवजी सवलत पास घेण्याचा तगादा लावला जात आहे. टोलनाक्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य वाहनधारकांची लूट सुरू असली, तरी महामार्गावर सोयीसुविधांचा अभाव पाहायला मिळतो. महामार्गालगत ठराविक अंतराकर शौचालय उभी केलेली नाहीत. कुठे अपघात झाला तर टोइंग व्हॅन वेळेत पोहोचत नाहीत.
अपघातग्रस्तांना केळेत दवाखान्यात नेले जात नसल्याने त्यांना जीव गमवावा लागतो. एवढय़ा गैरसोयी असताना कशासाठी टोल कसूल केला जात आहे, असा जाब आमदार शिंदे यांनी विचारला.
दरम्यान, बुधवाकी काँग्रेसने बंगळुरू महामार्गावरील टोलनाक्यांवर आंदोलन केले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आठ दिवसांत टोलमाफीचा निर्णय झाला नाही तर जनतेला घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.