अश्विनच्या मंकडिंगला धवनने दिले ‘ठुमका’ लावून प्रत्युत्तर

 सामना प्रतिनिधी ।  नवी दिल्ली

यंदाच्या आयपीएलच्या हंगामाच्या सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रवीचंद्रन अश्विन हा ‘मंकड रनआऊट’मुळे प्रकाशझोतात आला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अश्विन पुन्हा एकदा धवनला ‘मंकड रनआऊट’ करायला गेला. त्यावेळी धवनने अश्विनला क्रीझमध्ये चक्क नाचाचे ठुमके लगावत उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

अश्विन गोलंदाजी करीत असताना शिखर धवन अनेकदा क्रीझ सोडून पुढे जात होता. त्यामुळे अश्विनने त्याला मंकडिंगच्या थाटात धावबाद करण्याचा प्रयत्न केला, पण चपळाईने धवन क्रीझमध्ये परतला आणि त्याने चक्क नाचाचे ठुमके लगावत अश्विनला चिडवण्याचा प्रयत्न केला.