
सत्तेसाठी शिवसेनेशी गद्दारी करून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस सुरुच असून दहिसरमध्ये याचा प्रत्यय आला. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे बॅनर काढून भाजप कार्यकर्त्याचे बॅनर लावल्याने वादाची ठिणगी पडली आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
नगर – केडगावमध्ये राडा, भाजप समर्थकांकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखाच्या हॉटेलवर दगडफेक
लोखंडी रॉड, बांबू, तलवारीसह हाताला लागेल त्या वस्तूने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत भाजप कार्यकर्ता विभिषण वारे गंभीर जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून शिंदे गटाच्या शाखाप्रमुखासह 7 जणांविरुद्ध दहिसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
बोरिवली येथील कृष्णकांत सोसायटीच्या डेनीज लाईनजवळ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे बॅनर लागले होते. मात्र हे बॅनर काढून भाजप कार्यकर्त्यांनी आपले बॅनर लावले. याचा राग आल्याने शिंगे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना जाब विचारला. याच वादातून रात्री दोन वाजता तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याने दहिसर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध कलम 141, 143, 147, 149, 326, 324, 323, 405 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला.

































































