
सामना प्रतिनिधी। शिर्डी
शिर्डीच्या साईबाबांना आंध्रप्रदेश मधील एका भक्ताने ६ लाख ९० हजार रूपये किंमतीचे १९५ ग्राम वजनाचे सोन्याचे फुलपात्र दान केले. रामेश्वरराव शर्मा असे त्याचे नाव आहे.
सिकंदरा बाद येथील शर्मा व त्यांच्या कुटुंबाने दुपारच्या मध्यान आरती वेळी १९५ ग्रँम वजनाचे फुलपात्र साईचरणी अर्पण केले. ते परीवारासह आज शिर्डीत साईदर्शनाला आले होते. साईंना नैवेद्य देताना याच सुवर्ण फुलपात्राने पाणी पाजण्यात आले.
यापुढेही याच सुवर्ण फुलपात्राने आरती आधी साई बाबांना नैवैद्य देतेवेळी पाणी पाजन्यात येणार असल्याचे मंदिर प्रमुखांनी सांगितले. यावेळी संस्थानच्या वतीने शर्मा कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

































































