
अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा 2 जून रोजी सायंकाळी पाच वाजता शिर्डी येथील साईकिमया गार्डन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी, राजेंद्र दळवी, कोपरगाव शहरप्रमुख गगन हाडा उपस्थित होते.






























































