
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी गोरेगावात जनतेशी संवाद साधला. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलत होते. आपल्या स्वप्नातील देश निर्माण करण्यासाठी प्रादेशिकतेच्या आणि जातीधर्माच्या कोणत्याही भिंती न ठेवता एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मिंधे गट आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
आता आपण उत्तर भारतीयांच्या बैठकीत आलो आहोत. यावरही वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा जुना खेळच त्यांनी पुन्हा सुरू केला आहे. मात्र, आता आपल्याला मराठी-अमराठी, हिंदू-मुस्लीम हे सर्व भेद बाजूला ठेवत राष्ट्रनिर्मितीसाठी एकदिलाने काम करावे लागेल. आता हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवण्याचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. जगभरात देशाची प्रतिमा मलीन होत आहे. हेच आपल्याला अभिप्रेत होते काय असा सवाल त्यांनी केला. आता आपल्याला आपल्या स्वप्नातील देश निर्माण करण्यासाठी कोणतेही भेदाभेद न पाळता एकत्र येण्याची गरज आहे. आता एकता हेच आपले संरक्षक कवच आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आता आपण एकत्र आलो नाही, तर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरी सहन करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली ते द्वेषाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे डोळे उघडून सत्य काय आहे, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. हृदयात राम, हाताला काम हेच आमचे हिंदुत्व आहे. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपलेल्या हिंदूना जागे करण्याचे काम केले. त्याचा गैरफायदा ते घेत आहेत. बाळासाहेबांमध्ये हिंमत होती, म्हणूनच त्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असा नारा दिला होता. कोणावर अन्याय करू नका, पण कोणी अन्याय करत असेल तर तो सहनही करू नका, हीच आमची शिकवण आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राममंदिराचा मुद्दा गुंडाळून ठेवण्यात आला होता. तो पुन्हा आम्हीच उचलला, असेही ते म्हणाले.
मिंधे आणि भाजप यांच्यात हिंमत नाही, हे नेहमी दिसून आले आहे. आता त्यांना मी पुन्हा आव्हान देतो, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था. विधानसभा कोणत्याही निवडणुका घ्या. मात्र, ती हिंमत त्य़ांच्यात नाही. हिंमत नाही आणि ते स्वतःला हिंदूचे नेते म्हणवतात. हिंमत असते, तोच हिंदू असतो, असेही ते म्हणाले. मराठी- अमराठी यांच्यासह सर्व जातीधर्माचे लोक आता आमच्यासोबत आहेत. कोरोना काळात आम्ही केलेल्या कामामुळेच त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. आमचा वाढता जनाधार बघून ते बिथरले आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्याची हिंमत ते दाखवत नाहीत, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संवादातील मुद्दे
- आता आपल्या भेटी होतच राहतील. आता आपण एकत्र राहिले पाहिजे, त्यावर आपण भर देण्याची गरज आहे मराठी-अमराठी या भिंती आता तोडल्या पाहिजे. आपल्या एकता हेच आपले संरक्षक कवच आहेत.
- आता त्यांना मी पुन्हा आव्हान देतो, हिंमत असेल तर निवडणुका घ्या, ती हिंमत त्य़ांच्यात नाही.
- हिंमत नाही आणि ते स्वतःला हिंदू म्हणतात.आता मोठी सभा घेत एका विचाराचे लोक एकत्र आले पाहिजेत. त्यात मराठी, उत्तर भारतीय, हिंदू ख्रिश्चन, मुस्लीम सर्व आहेत.
- आता आपण एकत्र आलो नाही, तर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरी सहन करावी लागेल.आपल्याला आपल्या स्वप्नातली देश उभा करायचा आहे, ते काम तुम्हालाच करायचे आहे
- हृदयात राम, हाताला काम हेच आमचे हिंदुत्व. कोणावर अन्याय करू नका, पण अन्याय सहनही करू नका, हीच आमची शिकवण आहे. राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व आहे.
- हिंदू झोपले असताना बाळासाहेबांनीच त्यांना जागे केले त्याचा फायदा आता तेच घेत आहे.
- अध्योध्येला जाण्यापूर्वी शिवजन्मभूमीची माती घेऊन आपण अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर वर्षभरात याचा निर्णय आला
आपण रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेलो होतो. - राममंदिराचा मुद्दा गुंडाळून ठेवण्यात आला होता. तो पुन्हा आम्हीच उचलला.
- गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेबांनीच दिली होती.
- ते ज्या रस्त्याने जात आहे, त्यामुळे जगभरात देशाची प्रतिमा मलीन होणार आहे. घोड्याच्या लाथा तुम्ही खा, आम्ही घोड्यावरच बसा
- एकमेकांमध्ये भांडण लावायची आणि आम्ही घोड्यावरच बसणार, हे त्यांचे धोरण आहे.
- तोडा- फोडा राज्य करा, ही त्यांची ब्रिटिशांची नीती आहे.
- आम्ही मानवतेच्या भावनेने प्रत्येक काम करतो.
- आम्ही हिंदू-मुस्लीम आणि मराठी-अमराठी असा भेद कधीही केला नाही.
- आता आम्ही उत्तर भारतीयांशी संवाद साधत आहोत, तर त्याचाही त्यांना त्रास होत आहे.
- आता पंतप्रधान त्यांच्या सेभत गेले तर त्यांचे हृदय विशाल आहे.
- बोहरा समाजाचे लोक आजही आमच्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत गेल्यास आम्ही हिंदुत्व सोडले
- गळ्यात पट्टा घालून इतरांची गुलामगिरी करण्याचे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले नाही.
- आमच्यातले काहीजण गळ्यात पट्टा घालून गेले आहेत.
- आज चांगला दिवस आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यपालांना हटवले आहे.
- आम्ही भाजपला सोडले, मात्र, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही.
- आम्ही हिंदू आहोत म्हणजे मराठी सोडून इतरांचा आणि इतर धर्मियांचा अपमान करा, अशी शिकवण बाळासाहेब यांनी दिली नाही.
- त्याकाळी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना पाठिंबा दिला.
- शिवसेनेवर सांप्रदायिकतेचा आरोप करत आमच्यापासून अनेकजण दूर होते.
- आता त्यांना गरज नसल्याने त्यांनी शिवसेना, अकाली दल अशा पक्षांना सोडले.
- हिंदुत्व हा समान धागा असल्याने आम्ही 30 वर्षे राजकीय मैत्री निभावली.
- हा उत्तर भारतीयांचा मेळावा नसून ही बैठक आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गोरेगावकरांशी संवाद






























































