आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतच उभारा- शिवसेना

407

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारण्यासाठीच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतच उभारा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने लोकसभेत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण विधेयकाला समर्थन देताना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी ही मागणी केली. विधेयकाबाबतच्या काही सूचनाही त्यांनी लोकसभेत मांडल्या.

आपल्या भाषणात खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मुंबईत मुंबई स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आहे. देशभरातील व्यापारी बँकिंग मुंबईत मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मुंबईत आहेत. हे प्राधिकरण स्थापित करताना सेबी (SEBI), आरबीआय (RBI), आयआरडीए (IRDA) यांच्या स्वायत्तता, केंद्र सरकारचा या प्राधिकरणातील हस्तक्षेप, प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी थर्ड पार्टी एजन्सीची आवश्यकता याबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी केली. तसेच राजकीय भूमिकेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही याचीही खबरदारी घेण्याचे खासदारांनी सुचविले.

आपली प्रतिक्रिया द्या