
परस्त्री मातेसमान अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत महिलांवर अत्याचारांची मालिका सुरू आहे. कोणतीही महिला आज आपल्या कामाच्या अथवा वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षित नाही. त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मानाला प्राधान्य न देणारे केंद्र व राज्य सरकार शिवरायांच्या भूमीतून उलथवून लावले पाहिजे, असे प्रतिपादन उपनेत्या, प्रवक्त्या संजना घाडी यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरकारच्या बोलघेवडय़ा आणि पोकळ घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानातील शिरोळ येथील संवाद सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या संयोजनात सुरू असलेल्या या अभियानातील कोपरा सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तळागाळातील सामान्य माणूसही आपल्या मनात असणारा सरकारविरोधातील रोष संवाद सभेत व्यक्त करत आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, वैशाली जुगळे, साजिदा घोरी, प्रतीक धनवडे, नीलेश तवंदरकर, संजय अनुसे आदी उपस्थित होते.
‘अच्छे दिन’ आणतो म्हणत ‘बुरे दिन’ आणले
घरगुती गॅस सिलिंडर, डाळी, कडधान्यांचे वाढलेले भाव गगनाला भिडल्यामुळे महिलांचे घरच्या नियोजनाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. ‘अच्छे दिन’ आणतो म्हणून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील सर्वसामान्य महिला भगिनींना ‘बुरे दिन’ आणले. महिला, शेतकरी-कष्टकरी, कामगारविरोधी धोरणे स्वीकारून देशातील जनतेला देशोधडीला लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारला उलथवून लावण्यासाठी सर्वसामान्य जनतेने सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहनही संजना घाडी यांनी केले.
घाटकोपरमध्ये फसव्या योजनांचा भंडाफोड
मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) – होऊ द्या चर्चा या कार्यक्रमांतर्गत भटवाडी मार्पेट येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक 128 च्या वतीने केंद्रातील मोदींच्या सरकारच्या योजनांचा व नऊ वर्षांतील कार्याचा भंडापह्ड करण्यात आला. यावेळी घाटकोपर पश्चिमचे विधानसभा प्रमुख सुभाष पवार, उपविभागप्रमुख विलास पवार, उपविभागप्रमुख चारुशीला चव्हाण, घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक रवींद्र घाग, विधानसभा संघटक सुहासिनी नाईक, युवासेना कोअर कमिटी सदस्य राजोल पाटील, माजी नगरसेवक दीपक हांडे, शाखाप्रमुख संतोष साळुंखे, शाखा संघटक सुमंगल तेली, राजेश येलकर, बाळूशेठ काकडे, विलास लोटणकर, राजू शिर्सेकर आदी उपस्थित होते.
केंद्रात खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारचे अपयश घराघरापर्यंत पोहचवा, असे आवाहन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी केले. अक्कलकोट येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोरील मल्लिकार्जुन मंदिर प्रांगण येथे ‘होऊ दे चर्चा’ रथाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमाला विधानसभा संपर्कप्रमुख उमेश सारंग, जिल्हाप्रमुख सुनील कटारे, प्रिया बसवंती, अक्कलकोट शहरप्रमुख सिद्धाराम गुब्याड, सोपान निकते, शहर संघटक सचिन जकापुरे, समन्वयक श्रीशैल पाटील, शहर उपप्रमुख श्रीकांत शेडम, गंगाराम धोत्रे, शरण सुरवसे, गुरनिगप्पा पाटील, उमेश साळुंखे, आयाज जमादार, अफसर मकानदार, हणमंत नागुरे, परमेश्वर ठोंबरे, मृगेंद्र मुडनकेरी, बसवराज पुजारी, मल्लिनाथ अरवतकल, श्रीशैल गोणापुरे आदी उपस्थित होते.
होऊ द्या चर्चा, विचारा प्रश्न, ईशान्य मुंबईत एक हजार कार्यक्रम होणार
केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ईशान्य मुंबईत ‘होऊ द्या चर्चा, विचारा प्रश्न’चे एक हजार कार्यक्रम घेण्यात येतील, अशी माहिती शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी दिली. विक्रोळी विधानसभा ईशान्य मुंबई मध्यवर्ती कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
विभागप्रमुख-आमदार रमेश कोरगावकर, सुरेश पाटील, उपनेते दत्ता दळवी, विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकर, प्रज्ञा सपकाळ, उपविभागप्रमुख सुरेश शिंदे, अनंत पाताडे, धर्मनाथ पंथ, परम यादव, बेळगाव संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, शाखाप्रमुख रवी महाडिक, अभय राणे, सचिन मदने, मामा मंचेकर, नीलेश साळुंखे, विजय पडवळ, दीपक सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेला ग्लोबल नको लोकल सरकार हवे!
‘आम्हाला ग्लोबल नको, लोकल सरकार हवे’ असे मत शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांनी केले. शिवाजीनगर मतदारसंघात गुडलक चौक येथे आयोजित ‘होऊ दे चर्चा’ या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. हे सरकार जनतेचा अंत बघत आहे. पण यातून शेवटी उद्रेक होऊन मतपेटीतून जनता त्यांना त्याची जागा नक्की दाखवून देईल, असेही ते म्हणाले.
शहरप्रमुख गजानन थरकुडे, शहर संघटिका सविता मते, समन्वयक हाजीभाई शेख यांनीदेखील या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आनंद मंजाळकर, उमेश वाघ, प्रवीण डोंगरे, राजू पवार, अतुल दिघे, विलास सोनवणे, कलावती घाणेकर, करुणा घाडगे, पौर्णिमा बहिरट, भाग्यश्री सागवेकर, नयना वाघ, दीपाली शिगवण, अनिल बहिरट, संतोष ओरसे, मोहन कुराडकर, मयूर पवार, राजाभाऊ गांजेकर, सूर्यकांत पवार आदी यावेळी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील येलूर तालुक्यातील वाळवा येथे आयोजित ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर. यावेळी सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, अरुंधती दुधवडकर, आशा कोळी, अलका राजे, योजना पाटील, शकील सय्यद, उदयसिंह सरनोबत, विवेक सांडगे, भास्कर जाधव, अतुल पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.































































