मशाल पेटली आहे, गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय शांत होणार नाही; संजय राऊत यांचा घणाघात

छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुण्यभूमीत गद्दारांविरोधात मशाल पेटली आहे. हा वन्ही गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय शांत होणार नाही, असे खडे बोल सुनावतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातले सगळे देव संपलेत का, म्हणून मिंधे गट गुवाहाटीला गेलाय, असा जबरदस्त टोला लगावला. हे रेडे कुठेही गेले तरी आगामी निवडणुकीत त्यांचा राजकीय बळी महाराष्ट्रातील जनताच देणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेसाठी आतापर्यंत कैक शिवसैनिकांनी कुर्बानी दिली आहे. शिवसेना, ठाकरे कुटुंबासाठी जेलच काय जन्मठेपही भोगायला तयार असल्याचे संजय राऊत म्हणाले. अरे तुम्ही 40 आमदार पह्डले असाल, येथे विदर्भातले 40 लाख लोक शिवसेनेसोबत आहेत, हे लक्षात घ्या. शिवसैनिक म्हणजे निष्ठा! ती विकत घेता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात संविधान दिवस साजरा करण्यात आला. पण राज्यात कायद्याचे राज्य आहे का? बेकायदा सरकार आमच्या डोक्यावर बसले आहे. हे सरकार लवकरच जाणार, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 25 खासदार आणि 115 आमदार निवडून द्यावेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)