
आळंदी येथे वारकऱ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या मिंधे सरकारच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज चर्चगेट येथे टाळ-मृदुंग वाजवत आंदोलन करण्यात आले. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मिंधे सरकारचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा या वेळी करण्यात आल्या. या लाठीमाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही या वेळी शिवसैनिकांनी केली.
शिवसेना दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने चर्चगेट स्थानकाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. आम्ही काय अतिरेकी आहोत का असा सवाल या वेळी शिवसैनिकांनी पोलिसांना केला. ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’ अशा घोषणाही या वेळी शिवसैनिकांनी दिल्या. शिवसैनिकांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांची नावे नोंद करून पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
संगमनेरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना नेते बबन घोलप आणि संपर्कप्रमुख अजय व्हनोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

दक्षिण मुंबई विभाग क्र.12 तर्फे चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी, अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटिका युगंधरा साळेकर, उपविभागप्रमुख शिवाजी राणे, सुनील कदम, कृष्णा पवळे, राजू पह्डकर, अरविंद बने, उदय बने, युवासेनेचे विकास अडुळकर, पायल ठाकूर आदी सहभागी झाले होते.
View this post on Instagram

































































