अन्यायी इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना, युवासेनेकडून पश्चिम महाराष्ट्रात सायकल, बैलगाडी मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. हे दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने या अन्यायी दरवाढीविरोधात राज्यभर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातही केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. नगर, सांगली आणि कोल्हापूर येथे सायकल रॅली काढण्यात आली, तर मोहोळमध्ये बैलगाडी व सायकल रॅली काढण्यात आली.

कोल्हापूर – युवा सेना कोल्हापूर शहराच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली काढण्यात आली. या वेळी युवा सेना राज्य विस्तारक हर्षल सुर्वे, ऋतुराज क्षीरसागर, अविनाश कामते, योगेश चौगले, पीयूष चव्हाण, विश्वदीप साळोखे, शैलेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, कपिल सरनाईक आदींसह युवासैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जिल्हा व शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या उपस्थितीत युवा सैनिकांनी निवृत्ती चौक येथून सायकल रॅली काढली. या वेळी जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, वैभव जाधव, शेखर बारटक्के, अभिनय कानकेकर, अवदेश करंबे, कीर्तीकुमार जाधव, रोहित वेढे, मंगेश चितारे, शुभम अरंडे, विठ्ठल कोळेकर, अभिजित बुकशेट उपस्थित होते.

राधानगरी येथेही युवा सेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी बैलगाडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, तालुकाप्रमुख उत्तम पाटील, युवराज पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

सोलापूर / मोहोळ – सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलगाडा आणि सायकल मोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवा सेना सहसचिव विपुल पिंगळे, जिल्हा युवा अधिकारी महेश देशमुख, उपजिल्हा युवा अधिकारी लखन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, राजरत्न गायकवाड, महादेव गोडसे, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत गोडसे, सत्यवान देशमुख, रणजित गायकवाड, संजय काकडे, संजय काळे, शिवाजी पासले, भीमराव मुळे, बंडू मुळे, सचिन सुरवसे, सचिन उन्हाळे, सचिन जाधव आदी सहभागी झाले होते.

सांगोला – युवा सेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, उपशहरप्रमुख अमर साळुंखे, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील वाघमारे, युवा सेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, तालुका युवा अधिकारी सुभाष भोसले, समीर पाटील, रघुनाथ गायकवाड, श्रीनिवास करे, संतोष खडतरे, प्रकाश गायकवाड, ऋषिकेश गरांडे, योगेश खुळपे, महेश कारंडे, प्रभुलिंग स्वामी, परमेश्वर वाघमोडे, सुभाष घुटुकडे, रामचंद्र खांडेकर, सागर भादुले, रमेश वाघमारे, आशिष जाधव, विकी साळुंखे, अण्णासाहेब गाडवे, तात्यासाहेब पारसे, शंकर बेरगळ, रोहित भोसले, अक्षय कोळी, माउली गाडवे, सागर वाघमारे, साईराज अवघडे, अथर्व केंगार, अक्षय भोसले आदी सहभागी झाले होते.

पाथर्डी – शहरातील वसंतराव नाईक चौकातून युवा सेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख अंकुश चितळे, विष्णुपंत पवार, युवा शहर अधिकारी सचिन नागापुरे, दत्ता दराडे, सागर राठोड, नंदकुमार डाळिंबकर, सुरेश हुलजुते, संतोष मेघुंडे, सागर दिनकर, दत्ता पवार, सतीश वारुंगुळे, नवनाथ उगलमुगले, सुनील परदेशी, बाळासाहेब केंदळे सहभागी झाले होते.

कोपरगाव – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कमान येथून शहर युवा सेनेच्या वतीने सायकल रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सहसचिव विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील तिवारी, वाहतूक सेनेचे इरफान शेख, एस.टी. कामगार सेनेचे भरत मोरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, विशाल झावरे, विकास शर्मा, भूषण पाटणकर, गोपाळ वैरागळ, बाळासाहेब साळुंके, वैभव गिते आदींसह युवा सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

सांगली – शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. या वेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या उपस्थितीत आणि युवा जिल्हा अधिकारी ऍड. मिलिंद कदम यांच्या उपस्थितीत विटा येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत तालुकाप्रमुख प्रशांत भगत, उपतालुकाप्रमुख धनंजय मंडले, उपशहरप्रमुख प्रसाद लिपारे, उपजिल्हा अधिकारी रोहन जाधव, सोमनाथ फडतरे, अली मुल्ला, विकास पवार, बापूराव साळुंखे, अतुल भिसे, प्रदीप कदम, संदीप जाधव, प्रतीक पवार, आशिष सावंत, ओम चव्हाण यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक सहभागी झाले होते. सांगली व मिरजमध्ये सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला.