
टाटा रुग्णालयातील कनिष्ठ कारकून पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा रविवार, 29 सप्टेंबर रोजी व्यवस्थापनाने आयोजित केली आहे. त्या परीक्षेसाठी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मराठी उमेदवारांना या परीक्षेला सामोरे जाणे सोपे व्हावे यासाठी लोकाधिकार महासंघाने 23 ते 27 सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत. तज्ञ शिक्षक या वर्गामध्ये प्रशिक्षण देणार आहेत. अधिक माहितीसाठी महासंघाचे चिटणीस वामन भोसले (9821039507), उमेश नाईक (9869046036) किंवा शरद एक्के (9892699215) या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा दादर येथील शिवसेना भवनमधील महासंघाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.






























































