
उदय जोशी । बीड
विधानसभा संपर्कप्रमुख उद्धव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या नेतृत्वाखाली सर्कलनिहाय बूथ लेव्हल एजंटच्या बैठका बीड विधानसभा क्षेत्रात घेण्यात आल्या. यावेळी बीड विधानसभा संपर्कप्रमुख उद्धव कुमठेकर यांनी निवडणुकांदरम्यान बूथ लेव्हल एजंटनी कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन केले तर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी शिवसेनेकडून निवडणूकपूर्व काळातील ही तयारी असून राज्याच्या विधानसभेवर भगवा फडकावण्याची महत्वपूर्ण जबाबदारीही बूथ लेव्हल एजंटवर असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशावरून शिवसेना पक्षविस्तार हा बूथ लेव्हलवर करण्यास प्राधान्य देण्यात येत असून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली व बीड विधानसभा संपर्कप्रमुख उद्धव कुमठेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ लेव्हल एजंटच्या बैठका शनिवारी घेण्यात आल्या. सकाळी नाळवंडी, पिंपळनेर, बहिरवाडी सर्कलमधील बैठक घाटसावळी, दुपारी चौसाळा व नेकनूर सर्कलची बैठक लोकसभा संघटक विलास महाराज यांच्या निवासस्थानी चौसाळा येथे तर पाली सर्कलची बैठक नागनाथ मंदिर पाली येथे घेण्यात आल्या. तर 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बीड शहराची शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जालना रोड येथे, दुपारी 1 वाजता लिंबागणेश येथे लिंबागणेश सर्कल, सायंकाळी 5 वाजता साक्षाळपिंप्री बाजारतळ येथे नवगण राजुरी सर्कल, सायंकाळी 7 वाजता आर्वी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे रायमोहा व पाडळी सर्कलच्या बूथ लेव्हल एजंटच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारपी झालेल्या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने बूथ लेव्हल एजंट व बुथप्रमुखांनी उपस्थिती नोंदवली होती. यावेळी जिल्हाप्रमुखांसह, विधानसभा संपर्कप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बैठकांना विधानसभा संपर्कप्रमुख उद्धवजी कुमठेकर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, जिल्हा सचिव जयसिंग मामा चुंगडे, गोरख सिंघण, हनुमान जगताप, गणेश वरेकर, युवासेना जिल्हा संघटक सागर बहिर, सहसंघटक रतन गुजर, विधानसभा प्रमुख नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य गुंडिबा नवले, महिला आघाडी जिल्हा संघटक चंद्रकलाताई बांगर, विधानसभा संघटक प्रा रणजित आखाडे, तालुका संघटक नंदू जोगदंड, आदींसह बूथ लेव्हल एजंट, पक्षपदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.























































