पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणूनबुजून उशीर लावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपकर प्राप्त (सेस) जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातच बील मांडण्यात आले होते. याला दोन्ही सभागृहात मंजूरी देण्यात आल्यानंतर देखील केंद्रातून ते जाणूबुजून प्रलंबित ठेवण्यात आले. खासदार म्हणून मी स्वतŠ दिल्लीत पाठपुरावा केला होता. आता या निर्णयाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याने शिवसेनेच्या प्रयत्नांना यश आल्याचा आनंद आहे, असे मत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.

राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर देखील मागील दोन वर्षांपासून ते प्रलंबीत होते. याविरोधात आमदार अजय चौधरी, मी स्वत: वेळोवेळी आवाज उठविला. मुंबईत आक्रोश आंदोलन केले. अखेर दोन वर्षांनी याला मंजुरी मिळाल्याने आनंद आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी हा विषय प्राधान्याने हाताळला होता, असे सावंत म्हणाले.