बलुचिस्तान, PoK घेण्याची भाषा करणाऱ्यांकडे आपलाच चषक परत आणण्याची कुवत नाही – संजय राऊत

देशातील नागरिकांचा विरोध असतानाही जय शहा यांच्या हट्टापोटी हिंदुस्थानी क्रिकेट संघ पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळला. तो चषक आपण जिकलाही, मात्र, अद्याप तो पाकिस्तानकडे असून तो चषक हवा असेल तर तो आमच्याकडूनच स्विकारावा लागेल, अशू भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे.

बलुचिस्तानसह पाकव्याप्त कश्मीर घेण्याची भाषा सरकारकडून करण्यात येत आहे. असे असताना आपण क्रिकेटमध्ये जिंकलेला चषक सरकार परत आणू शकत नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंस म्हणाले आहे की, संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे. असे आहे, तर चषकही पाकिस्तानच आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि जय शहा यांनी एकत्र बसून यातून योग्य तो म्रग काढावा, जय शहा अंत्यय हुशार माणूस आहे, ते यातून नक्की तोडगा काढतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

ऐसा कोई सगा नही, जिसको भाजपने ठगा नही, हे आपण आधीच सांगितले आहे. भाजप सर्वात आधी आपल्या मित्रपक्षांवरच वार करतो. व्यक्तीकेंद्रीत राजकारण झाल्याने भाजपात असे प्रकार सुरू आहेत. महायुतीतील मित्रपक्षांमध्येच सुरू असलेली फोडाफोडी यातून तेच दिसून येत आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार फडणवीसांकडून फोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्याला भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. फडणवीसांच्या गटात नसलेल्यांसमोर अनेक आव्हाने उभी करण्यात येत आहेत. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असे ते म्हणाले.