
सामना प्रतिनिधी । कुडाळ
वेताळबांबर्डे शिवसेना व बाळा भोसले मित्रमंडळाच्या वतीने आणि जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते तथा जि. प.सदस्य नागेंद्र परब यांच्या सौजन्याने जि.प.मतदारसंघातील दहावी- बारावीत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या सौजन्याने शेतकरी ग्रामस्थ यांना ताडपत्रीचे वाटप, ज्येष्ठांचा सत्कार तसेच वृक्ष वाटप व डबलबारी कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमाचे कार्यक्रम नुकताच मांगल्य मंगल कार्यालय वेताळबांबर्डे येथे पार पडला.
खासदार विनायक राऊत यांचे स्वीय सहाय्यक तथा जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, उपसभापती श्रेया परब, दाजी आईर, कुडाळ तालुका महिला संघटना स्नेहा दळवी, भालचंद्र केळुसकर बुवा, राजू गवंडे, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, सुखदा परब, सुबोध सामंत, मोहीन परब, यशिका परब नीलेश गव्हाणकर, आबा तळेकर, सौ.पाटकर, सौ. सामंत, दिनेश कदम, भाई कलींगण, सुहास गावडे, विनायक कदम, वामन गोरे, प्रदीप गावडे, सुहास गावडे, मुकुंद सरनोबत, नरेंद्र राणे, बाजीराव झेंडे, सागर घाडी, गुंडू सावंत, गुरु सावंत, बंडू चव्हाण, बाळा भोसले, रवी कदम, संजय वेतूरेकर, रोहिणी चव्हाण, विजय मयेकर, यतीन सामंत शिवसेना शाखा पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांचे विश्वासू शिलेदार म्हणून नागेंद्र परब यांची ख्याती आहे. त्यांनी आपल्या माध्यमातून वेताळबांबर्डे मतदारसंघात विकासाची गंगा आणली, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी यावेळी केले. नागेंद्र परब म्हणाले शिवसेनेच्या माध्यमातून या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. मोठ्या प्रमाणात या भागात विकासकामे झाली आहेत. यापुढेही खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना.दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सुत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. या सोहळ्यानंतर समीर कदम व अभिषेक शिरसाट या बुवांचा डबलबारी जंगी सामना झाला.




























































