वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत मंगळवारी मशाल यात्रा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ दोन दिवस संभाजीनगर दौऱ्यावर आहे. मंगळवार, 7 मे रोजी दुपारी 12 वाजता मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे शिवसेना युवासेना पदाधिकारी यांची आढावा बैठक होणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर, शिवनेरी कॉलनी, एन 9 सिडको ते टीव्ही सेंटर चौक, छत्रपती संभाजीनगर दरम्यान भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनाचे कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.