
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर हे नाव माहीत नाही असा माणूस मिळणं अशक्य आहे. अनेक विक्रम करणाऱ्या सचिनच्या 10 हजार शतकांचा विक्रम हा त्यापैकी एक. त्याच्या शतकांवर त्याचाच समकालीन क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने एक मोठं विधान केलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याच्या नियमांवर बोट ठेवून शोएबने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जर आजच्या नियमांमध्ये सचिन खेळत असता तर त्याच्या 1 लाखांहून जास्त धावा झाल्या असत्या, असं शोएब आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे. तो म्हणाला की, सध्याचे नियम हे फलंदाजांना प्रचंड फायदेशीर आहेत. आता तुम्ही एक दिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूंसोबत खेळता. तुम्ही नियम खूप कडक केले आहेत. हे नियम फक्त फलंदाजांनाच लाभदायक ठरतात, असं शोएब म्हणाला आहे.
तो पुढे म्हणाला की, असे नियम जर सचिन तेंडुलकरच्या वेळी असते तर त्याच्या एक लाखाहून अधिक धावा झाल्या असत्या. सचिनने आतापर्यंत खूप कठीण अशा गोलंदाजीचा सामना केला आहे. मला त्याच्यावर दया येते. त्याने सुरुवातीला वसीम अक्रम आणि वकार युनूससारख्या गोलंदाजांचा सामना केला. त्यानंतर त्याची गाठ शेन वॉर्न, ब्रेट ली आणि माझ्याशी पडली. त्यानंतर त्याने पुढच्या पिढीच्या गोलंदाजीवरही फलंदाजी केली. त्यामुळे मी त्याला एक उत्कृष्ट फलंदाज मानतो, असं शोएब म्हणाला आहे.
शोएबच्या म्हणण्यानुसार, बाउन्सर गोलंदाजांची संख्याही वाढवणं गरजेचं आहे. तुम्हाला क्रिकेटमध्ये संतुलन राखायचं आहे. तर, तुम्हाला बाउन्सर गोलंदाजांची संख्या वाढवली पाहिजे. जोपर्यंत टी-20 क्रिकेट नव्हतं, तोपर्यंत एक संघ एका वर्षात 12 ते 15 कसोटी सामने खेळत असे. पण, टी-20 आल्यानंतर कसोटी सामन्यांची संख्या घटली आहे आणि त्याचा गोलंदाजांच्या फिटनेसवरही परिणाम झाला आहे.

























































