
सामना प्रतिनिधी । नगर
नगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज विक्री आज प्रारंभ झाला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याने प्रभाग 9 नऊसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे.
नगर मनपा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शहरातील केडगाव बुरुडगाव जुनी महानगरपालिका व साकेडीतील प्रभाग कार्यालयात सकाळी साडे दहा वाजल्यापासून उमेदवारी अर्जांच्या विक्रीस प्रारंभ झाला. श्रीपाद छिंदम याने प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्यासाठी आज उमेदवारी अर्ज घेतला. त्याची पत्नीदेखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. त्यांनीदेखील प्रभाग क्रमांक 13 साठी उमेदवारी अर्ज घेतला.


























































