आमची बांधिलकी जनतेशी… महायुतीचा विजय निश्चित!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कर्जत

राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही शहरात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली आहेत. आमची बांधिलकी जनतेशी असल्याने कर्जत नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या प्रचार कार्यालय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रचार कार्यालय उद्घाटन कार्यक्रमास मोठय़ा संख्येने कार्यकर्ते, मतदारांनी गर्दी केली होती. यावेळी बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांत शहरात मोठय़ा प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत. या काळात जनतेशी बांधिलकी तसूभरही कमी होऊ दिलेली नाही. यामुळे मतदार नक्की महायुतीला साथ देतील हा विश्वास आहे. यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा जोशी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, सरचिटणीस दीपक बेहेरे, रमेश मुंढे, आरपीआयचे कोकण प्रदेश सचिव मारुती गायकवाड, नगरसेवक अरविंद मोरे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

घरोघरी औक्षण
महायुतीचे उमेदवार अरुणा वायकर, राजेश धराडे, बळवंत घुमरे, संचिता पाटील, विवेक दांडेकर, विशाखा जीनगरे, पूनम बोबडे, राहुल डाळिंबकर, यमुताई विचारे, नीलिमा गोसावी, नितीन सावंत, प्राची डेरवणकर यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या पदाधिकाऱयांनी घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. घरोघरी उमेदवारांचे औक्षण केले जात होते.