
सामना ऑनलाईन, मुंबई
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. प्रेâम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभलग्न सावधान’ या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्र्दिशत या सिनेमाचे सोशल नेटवर्कींगसाईटवर नुकतेच पोस्टर लाँच करण्यात आले. ‘शुभलग्न सावधान’ असे या सिनेमाचे शीर्षक लक्षात घेता, हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित असल्याचा अंदाज येतो. पल्लवी विनय जोशी यांची र्नििमती असलेला हा कौटुंबिक सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रर्दिशत होत असून प्रेक्षकांना यात आशयघन मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर एकत्र येत असलेल्या सुबोध-श्रुतीच्या चाहत्यांसाठी ‘शुभलग्न सावधान’ हा सिनेमा खूप खास ठरणार आहे, हे निश्चित!




























































