श्यामची आई चित्रपटाचं पोस्टर रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. हा चित्रपट येत्या दिवाळीत रिलीज होणार आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारीत या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये त्याची उत्सुकता वाढली आहे.

श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, सारंग साठ्ये,मयूर मोरे,उर्मिला जगताप,भूषण विकास,सुनिल अभ्यंकर , अक्षया गुराव अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे . तर सुपरहिट ‘पावनखिंड’ चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब अजय -अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.