संस्कृत पाठशाळेच्या सचिवाला ठार मारले, गायिकेच्या वडिलांसह 3 शिक्षकांना अटक

प्रातिनिधिक फोटो

कर्नाटकात सुपारी देऊन चक्क संस्कृत पाठशाळेच्च्या सचिवाला ठार मारण्यात आले आहे. या प्रकरणी एका गायिकेच्या वडिलांसह  संस्थेच्या तीन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकातील मैसुर भागात एक संस्कृत पाठशाळा आहे. या पाठशाळेत पराशिवमुर्ती हे सचिव पदावर कार्यरत होते. 20 सप्टेंबर रोजी पराशिवमुर्ती यांचा राहत्या घरी चाकूने भोसकून खून करण्यात आला होता.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणी पराशिवमुर्ती यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. तेव्हा पराशिवमुर्ती यांचा बायकोशी घटस्फोट झाला असून दोघे विभक्त झाल्याचे समोर आले. परंतु त्यांच्या बायकोचा या खुनाशी काहीच संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

नंतर पराशिवमुर्ती ज्या संस्थेत काम करत होते तिथे चौकशी केले असता सत्य समोर आले. संस्थेत पराशिवमुर्ती यांचे काही लोकांशी भांडण होते. पराशिवमुर्ती शिक्षकांचे पगार देण्यासाठीत त्यांच्याकडून लाच घेत होता.

त्यामुळे गायिका अनन्या भट हिचे वडील विश्वनाथ भट यांनी पराशिव सिद्दराजु यांच्यासोबत पराशिवमुर्ती यांच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी काही 7 लाखांची सुपारी देण्यात आली होती. तसेच नोकरीचे वचनही दिले होते. खुनापूर्वी एक लाख रुपयांचा ऍडव्हान्सही देण्यात आला होता.

सुपारीबाजांनी पराशिवमुर्ती यांच्या राहत्या घरी चाकूने भोसकून त्यांचा खून केला. अखेर या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या