
अफगाणिस्तानातील तालिबानींचे वाढते वर्चस्व अमेरिका, रशिया आणि हिंदुस्थानसाठी मोठी समस्या ठरत आहे. कंदाहारमध्ये तालिबानी आणि अफगाणिस्तान आर्मी यांच्यामध्ये युद्ध छेडले गेले असून येथील बिघडलेल्या परिस्थितीमुळे हिंदुस्थानी दूतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा हिंदुस्थानात आणण्यात आले आहे. पाकिस्तानमार्गे त्यांना हिंदुस्थान आणण्यात आले असून सूत्रांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानातील 85 टक्के तालिबानींनी कब्जा केला आहे.



























































