
केतन अगरवाल याच्या हत्ये प्रकरणी आज आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची न्यायालयाने चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सिया व चेतन दोघांनाही आज कडक बंदोबस्तात वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने पुढीत तपासासाठी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.
पुणे- पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा केतन आणि मार्केटयार्डातील मसाले विक्रीचे व्यापारी प्रवीण गोयल यांची मुलगी सिया यांचा साखरपुडा झाला होता सियाला केतनसोबत लग्न करणे मान्य नसल्यामुळे तिने आरोपी बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या मदतीने लोहगडावरून ढकलून देत १८ जूनला केतनचा खून केला. या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायालयात काय घडले?
सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “या गुन्ह्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली असून, अनेक महत्त्वाचे पुरावे हस्तगत करायचे आहेत. तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे.” न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.


























































