कौशल्य भारत योजनेंतर्गत फिटनेस प्रशिक्षणार्थींना विशेष बूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fitness-new

सामना प्रतिनिधी । मुंबई

फिटनेस इंडस्ट्रीचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमात व्यायाम प्रशिक्षकांसाठीच्या अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. केंद्राच्या कौशल्य विकास आणि उद्योगशीलता खात्याच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या कौशल्य भारत योजनेंतर्गत मुंबईतील ‘के इलेव्हन फिटनेस सायन्स अॅकॅडमी’ दरवर्षी दोन हजारांहून अधिक मराठी तरुणांना फिटनेस ट्रेनर-व्यायाम प्रशिक्षक बनण्यासाठीचे प्रशिक्षण देत आहे.

स्किल इंडिया उपक्रमाच्या अंतर्गत मुंबई व पुणे येथील ‘के इलेव्हन फिटनेस सायन्सेस अॅकॅडमी’तील या दोन हजार प्रशिक्षणार्थींना यंदा वेट ट्रेनिंग एक्सरसाइजसाठी नव्यानेच डिझाईन करण्यात आलेले ‘स्टँडर्ड इश्यू लिफ्टिंग शूज’ हे विशेष प्रकारचे बूट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.