गंमत म्हणून 17  वर्षाच्या मुलासोबत केले अश्लील चाळे, 7 अल्पवयीन मुलांची रिमांड होममध्ये रवानगी

घाटकोपरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 7 अल्पवयीन मुलांनी एका 17 वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे केले आहेत. त्याचा एक व्हिडीओ काढून त्यांनी तो व्हायरलही केला. पोलिसांनी या प्रकरणी सातही मुलांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. घाटकोपरमध्ये 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा राहत होता. त्याच्या शेजारी त्याचे काही मित्र राहत होते. एका मित्राने मुलाला घरी कामा निमित्त बोलावले. तेव्हा सातजण तिथे उपस्थित होते. सातही मुलांचे वय 13 ते 15 दरम्यान आहे. तेव्हा सात मुलांनी मिळून 17 वर्षाच्या मुलाला धरून ठेवले. त्याचे हात पाय धरून त्याचे कपडे काढले आणि त्याच्या गुप्तांगात लाटणं घातलं. इतकेच नाही तर या घटनेचा व्हिडीओही त्यांनी शूट केला. नंतर पीडित मुलाला या मुलांनी सोडून दिले. मुलगा घरी पोहोचल्यानंतर याबाबत त्याने कुणालाच नाही सांगितले.

काही दिवसांनी पीडित मुलाच्या मोठ्या भावाला मोबाईलवर या घटनेची व्हिडीओ क्लिप मिळाली. त्याने आपल्या भावाला विचारले असता त्याने सर्व हकीगत  सांगितली. तेव्हा पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सर्व सात मुलांना ताब्यात घेतले. त्यांना विचारले असता हे सर्व गंमत म्हणून केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी सर्व मुलांची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या