
आरटीई प्रवेशाची यादी प्रसिद्ध झाली असून, सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 641 विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतलेला नाही. आतापर्यंत केवळ 518 विद्यार्थ्यांनीच आरटीईतून प्रवेश घेतला असून, उर्वरित विद्यार्थ्यांना आता 7 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीत प्रवेश न घेतल्यास इतरांना संधी दिली जाणार आहे.
प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळेला देऊन मुदतीत मुलांचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. 7 मेपर्यंत प्रवेश न घेतल्यास त्याठिकाणी प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी दिली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 295 नामवंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यंदा दोन हजार 160 विद्यार्थ्यांना आरटीईतून प्रवेश मिळणार आहे. पण, सोलापूर शहर, मंगळवेढा व दक्षिण सोलापूर या तिन्ही तालुक्यांत आरटीईअंतर्गत अद्याप एकही प्रवेश निश्चित झालेला नाही.
प्रवेशाची ऑनलाइन लॉटरी निघाल्यापासून केवळ 518 विद्यार्थ्यांनीच प्रकेश घेतले आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातात. त्यामुळे 7 मेनंतर आरटीई प्रवेशाची दुसरी यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती शालेय शिक्षण किभागातील करिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
सोलापूर शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या 17 शाळांमध्ये 324 किद्यार्थ्यांना आरटीईमधून मोफत प्रवेश मिळणार आहे. लॉटरीनंतर प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेजदेखील आलेला आहे. तरीसुद्धा अद्याप सोलापूर शहरातील एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, हे विशेष. आरटीई प्रवेशाची लॉटरी निघून आता 15 दिवस झाले आहेत. दरम्यान, सध्या त्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. मात्र, मुदतीत प्रकेश न घेतल्यास संबंधितांना प्रवेशाला मुकावे लागणार आहे.




























































