परीक्षांचे वेळापत्रक आता महाविद्यालयेच ठरविणार, सोलापूर विद्यापीठाची पुरवणी परीक्षा 1 सप्टेंबरपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्र परीक्षांचे वेळापत्रक आता यापुढे विद्यापीठ नव्हे, तर संलग्नित महाविद्यालयेच ठरविणार आहेत. परीक्षा घेणे B उत्तरपत्रिकांच्या तपासणीची जबाबदारीही त्या महाविद्यालयांवर असणार आहे. या निर्णयामुळे सत्रातील अभ्यासक्रम किती शिकवून झाला, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, याचा किचार होऊन केळापत्रक अंतिम होईल. जेणेकरून पुन्हा त्यात बदल करण्याची नामुष्की ओढवणार नाही. सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

सत्र परीक्षा झाल्यापासून 30 दिकसांत निकाल जाहीर करणे किद्यापीठास बंधनकारक आहे. मात्र, निकालास 45 दिकसांहून अधिक कालाकधी लागल्यास त्याचे स्पष्टीकरण राज्यपालांना द्याके लागते. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक त्यासाठी जबाबदार असतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, निकाल वेळेत जाहीर होऊन नवीन सत्र वेळेकर सुरू व्हावे म्हणून विद्यापीठ प्रशासनाने आता परीक्षांच्या नियोजनाची जबाबदारी महाविद्यालयांकरच सोपविली आहे. तृतीय व र्षावरील परीक्षांचे नियोजन मात्र विद्यापीठाकडूनच होईल. सुट्टीचे दिवस सोडून अध्यापनाचा कालावधी 90 दिवस पूर्ण झाल्याकर सत्र परीक्षा घेतली जाते. आता आगामी सत्र परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे.

दरम्यान, आता विद्यापीठातील सर्व अधिविभाग व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे. दुसरीकडे संलग्नित ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदकीच्या अभ्यासक्रमांसाठीही हे धोरण लागू आहे. त्यानुसार त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत.

सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचे निकाल केळेत जाहीर व्हावेत म्हणून सध्या ऑनक्रिन मूल्यमापन पद्धत कार्यान्वित करण्यात आली आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्कॅनिंग सेंटरमध्ये सर्वच उत्तरपत्रिका स्कॅन करून संबंधित प्राध्यापकांना पाठवून त्या तपासून घेतल्या जातात. पण, आता प्रथम व द्वितीय कर्षाच्या परीक्षांचे नियोजन त्या त्या महाविद्यालयांकडे असल्याने ही पद्धत आता सुरू राहणार की बंद होणार, याचा निर्णय नवीन कुलगुरू घेणार आहेत. 28 ऑगस्टला मुलाखती होणार असून, त्यात पाचजणांची नाके अंतिम होतील. त्यानंतर राज्यपाल त्यांच्यासोबत संवाद साधतील आणि सप्टेंबरमध्ये नवीन कुलगुरूंची निवड जाहीर होईल.

नव्या निर्णयानुसार प्रथम व द्वितीय वर्षाच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक ठरविणे, त्याचे नियोजन व उत्तरपत्रिकांची तपासणीची जबाबदारी त्या त्या महाविद्यालयांवर असेल. त्यामुळे पेपर संकलित करून त्याचे गठ्ठे करून स्कॅन करणे आणि त्यानंतर प्राध्यापकांना शोधून त्यांना त्याची जबाबदारी देण्यात मोठा विलंब होतो. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षेच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण केले आहे. पण, परीक्षांची प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडूनच त्यांना पुरविली जाणार आहे. जेणेकरून त्यात पारदर्शकता राहील, हा त्यामागील हेतू आहे.

सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या वतीने आता 1 सप्टेंबरपासून पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणासाठी अडचण येणार नाही, हा त्यामागील हेतू आहे. जिह्यातील जवळपास दहा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी पुढील आठवडय़ापासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत़

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व मुंबई अशा विद्यापीठांमध्ये परीक्षांचे विकेंद्रीकरण यापूर्वीच करण्यात आलेले आहे. आता आपणही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी तसा निर्णय घेतला आहे. प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक ठरवणे, नियोजन करणे व उत्तरपत्रिकांची तपासणीची जबाबदारी त्या त्या महाविद्यालयांकर असणार आहे.

– डॉ. राजनीश कामत, प्रभारी कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.