सोनू सूदचे रॅम्पवॉक

सामना ऑनलाईन । मुंबई

जेडब्लू लाइफस्टाइल इंडिया लि.चे संचालक सिद्धेश चौहान यांनी लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये सामुराई कलेक्शन सादर केले. सिद्धेश चौहानसाठी सोनू सूदने रॅम्पवॉक केले. यावेळी सोनूने सांगितले, ‘मीसामुराई आणि त्यांच्या जीवनशैलीचा फॅन आहे. जेव्हा मी सिद्धेश यांची भेट घेतली तेव्हा मला त्यांच्या कामामुळे थक्क व्हायला झाले.’ या संकलनात त्याने सामुराईंच्या शिस्त व निर्भयतेला खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शित केले आहे. ‘त्यांच्या या दृष्टिकोनाचा मी एक भाग असल्याचा मला आनंद वाटत आहे.’ सध्या हे कलेक्शन जेडब्लूच्या सिलेक्ट स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ते इतर स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.