ब्रम्हांडात सर्वात मोठा विस्फोट, एका ताऱ्याचा मृत्यू…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वीपासून एक अब्ज प्रकाशवर्ष दूर अंतरावर गॅमा रे विस्फोट झाला असून शास्त्रज्ञांनी हे महत्त्वाचे दृश्य टिपले आहे. अंतराळातील आजवरचा हा सर्वात मोठा स्फोट समजला जात आहे. ही घटना एका ताऱयाच्या मृत्यूनंतर घडल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

जर्मनी येथील हॅम्बर्गच्या इलेक्ट्रॉन सिंक्रोट्रोनच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ताऱयाचा मृत्यू झाल्यानंतर त्या ताऱयाची ब्लॅक होलमध्ये परावर्तित होण्याची प्रक्रिया पॅमेऱयात पैद झाली आहे. अंतराळात असलेल्या फर्मी आणि स्विफ्ट टेलिस्कोपने ही घटना नोंदवली आहे. याशिवाय नामिबियामधील हाय एनर्जी स्टिरियोस्कोपिक सिस्टीम टेलिस्कोपनेदेखील व्हिडियो टिपला आहे.

करोडो प्रकाशवर्ष दूर हा विस्फोट झाला असला तरी शास्त्रज्ञ याला पृथ्वीच्या जवळील घटना मानत आहेत. हा गॅमा किरणांचा मोठा स्फोट होता. त्यामुळे खूप प्रखर प्रकाश त्या ताऱयातून निघाला. शास्त्रज्ञांच्या मते, विस्फोटानंतर खूप मोठय़ा प्रमाणात एक्स रे आणि गॅमा रे अंतराळात पसरत आहेत. जर्मन इलेक्ट्रॉन सिंक्रोट्रोनचे शास्त्रज्ञ डॉ. अॅडर्य़ू टेलर यांच्या मते, पुढील काही दिवस गॅमा रे दिसत राहतील. या घटनेसंबंधी पेपर सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्याची लेखिका सिल्विया झू यांनी सांगितले, तारा अतिशय वेगाने फिरत होता आणि ज्याक्षणी त्याचा स्फोट झाला तो क्षण टिपण्यात आम्हाला यश आले.