अलमट्टी धरणातील विसर्गामुळे पूर? भीमा-कृष्णा खोऱ्यांचा अभ्यास

763

राज्यात जून व जुलै महिन्यात खासकरून कोल्हापूर व सांगली जिह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीची कारणे शोधण्यासाठी व भविष्यात उपाय योजण्यासाठी दहा जणांची अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती का यासह अन्य कारणांचा अभ्यास करून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ही समिती अहवाल सादर करणार आहे.

मागील महिन्यात कृष्णा खोऱ्यात अतिपर्जन्यमानामुळे राज्यात खासकरून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी झाली. नक्की कोणत्या कारणांमुळे पूर आला यावरून तज्ञांनी वेगवेगळी मते व्यक्त केली. त्यामुळे पुराच्या कारणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जलसंपदा विभाग, केंद्रीय जल आयोग, हवामान खाते, आयआयटी अशा वेगवेगळ्या विभागांतील दहा तज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय राज्याच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे.

अहवाल सादर करण्याची तारीख
ही समिती येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करील.
समिती कोणता प्रमुख अभ्यास करणार
भीमा-कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सखोल अभ्यास
कर्नाटकच्या अलमट्टी व इतर धरणांच्या जलाशयामुळे महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली का?
भविष्यात अशी पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारला शिफारस.

समितीतील तज्ञ
जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदपुमार वडनेरे हे समितीचे अध्यक्ष आहेत तर जलसंपदा नियमन प्राधिकरणाचे सदस्य विनय पुलकर्णी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर, आयआयटीचे प्रा. रवी सिन्हा, केंद्रीय जल आयोगाचे मुख्य सचिव नित्यानंद राव तसेच हवामान विभाग, पुणे आयआयटीएममधील तज्ञ आदींचा यात समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या