
सामना ऑनलाईन, मुंबई
सई ताम्हणकरने नुकताच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. घनश्याम लालसा असे त्याचे नाव असून सईने या फोटोला पिवळय़ा हार्ट ईमोजीची जोड दिल्याने त्यांच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीच कबूल केले नसले तरी या दोघांचे सतत एकत्र दिसणे, कार्यक्रमांना हजेरी लावणे यावरून त्यांच्यात काही सुरू असल्याचे कळतंय.
29.2k Likes, 52 Comments – Sai Tamhankar (@saietamhankar) on Instagram: “”
सईने हा फोटो पोस्ट केल्यावर दोघांमध्ये झालेल्या संभाषणानेही चांगलीच गंमत आणली आहे. फोटोवर कमेंट करताना हा फोटो सणाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचे असल्यामुळे पोस्ट केल्याचे घनश्यामने गमतीने म्हटले आहे.



























































