श्रीरामपूर – सहा दिवसांपासून व्यापारी गायब, भावाचा अपहरण झाल्याचा आरोप

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय – 49) हे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असून अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी तातडीने हिरण यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी आज शनिवारी बेलापूर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.

सोमवार 1 मार्च रोजी हिरण अचानक बेपत्ता झाले. त्यांचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार त्यांचे बंधू पंकज झुंबरलाल हिरण यांनी पोलिसात दिली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु सहा दिवस उलटून गेले तरी हिरण यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हिरण यांचा शोध घ्यावा यासाठी आज बेलापूर गावातील व्यापारी, नागरिकांनी सकाळ पासून आप आपले व्यवहार बंद ठेवले.

पोलीस अधीक्षक यांची भेट

पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता बेलापूर गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि नागरिकांबरोबर संवाद साधला. हिरण यांच्या शोधण्यासाठी ठिकठिकाणी पोलिस पथके रवाना केली आहेत, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या