Solapur News – सोलापूर-हैदराबाद महामार्गावर एसटी आणि ट्रकची धडक, 16 प्रवासी जखमी

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बोरामणी गावाजवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात बसच्या एका बाजूचा चेंदामेंदा झाला. अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण समजू शकले नाही.

एसटी बस बिदरहून पंढरपूरकडे येत होती. यादरम्यान बोरामणी गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने एसटीला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली आहे.