कोरोना पार्श्वभुमीवर बीड जिल्ह्यात एस.टी. महामंडळाची धडक मोहीम

2655

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रवाशी कर्मचार्‍यांची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून दक्षता घेतली जात आहे. परिवहन महामंडळाने आता धडक मोहिम राबविण्यात सुरूवात केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिवहन महामंडळाने युद्ध पातळीवर दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. पुणे, मुंबईसह इतर सर्व बस मार्गावर जाण्यापूर्वी डेटॉल, फिनाईल, लिक्विड साबण यांच्या मिश्रणाने बसेस स्वच्छ धुवून घेतल्या जात आहेत. बसेस संपूर्णपणे निर्जंतुकीकरण केले जात आहे. बसस्थानक परिसरामध्ये रोज निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम राबविली जात आहे. गर्दीद्वारे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि दोन प्रवाशामधील संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून एका सीटवर एकच प्रवासी बसवला जात आहे. परिवहन महामंडळाच्या कर्तव्यावर असणार्‍या वाहकांना संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचे वाटप केले जात आहे.

हात धुण्यासाठी बसस्थानकावर लिक्विडयुक्त पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक बसेसवर दक्षता घेण्यासाठी स्टिकर्स लावण्यात आले आहेत. एस.टी.महामंडळ सर्वतोपरी पावले उचलत असून कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी प्रवाशांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन एस.टी.महामंडळातर्फे केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या