
गोरेगावच्या सेंट झेवियर विद्यालयाने विलेपार्ले येथे आयोजित मुंबई एमक्यू आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत 16 वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले.
सेंट झेवियरने या स्पर्धेत एकही लढत न गमावता अजिंक्य राहण्याचा पराक्रम केला. अंतिम लढतीत या संघाने पानबाई इंटरनॅशनल स्कूल संघाचा 2-0 असा धुव्वा उडवत जेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले. सेंट झेवियर संघाने पहिल्या लढतीत पानबाई अ संघावर 3-2 अशी चुरशीची मात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी आर.एन. शाह शाळेचा 9-0 असा धुव्वा उडवत विजयी दौड कायम राखली.




























































