
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्वाइन फ्लूची तपासणी करण्यासाठी संभाजीनगर, लातूर या ठिकाणी नवीन सरकारी लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात पुणे, नाशिक, नगर व इतर आणखी तीन ठिकाणी लॅब उभारण्यात येणार असल्याची माहिती सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. राज्यात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी स्वाइन फ्लूचे निदान करणारी चाचणी केंद्रे ही जिल्हानिहाय असायला हवीत अशी मागणी करणारी याचिका ऍड. दत्ता माने यांनी ऍड. राधिका सामंत यांच्या कतीने न्यायालयात दाखल केली आहे.
मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर बुधवारी याप्रकरणी सुनाकणी घेण्यात आली. स्काइन फ्लू या रोगाचे निदान करण्यासाठी संभाजीनगरमध्ये एकही चाचणी केंद्र नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास गेल्या सुनावणीदरम्यान आणून दिल्यानंतर हायकोर्टाने सरकारला धारेवर धरत लवकर ही केंद्रे उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी संभाजीनगर आणि लातूर येथे लॅब उभारण्यात आल्याचे कोर्टाला सांगितले.































































