डासांना करा बायबाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

-घरामध्ये कॉईल वापरण्याऐवजी रिफील वापरणे सुरक्षित आहे. यामध्ये धुराचा त्रास होत नाही. पण घरच्या घरीही कमी खर्चात रिफील बनवता येऊ शकते.
-घरातील दारं-खिडक्या बंद करून कापूर जाळा व त्याचा धूर १५-२० मिनिटे घरात राहू द्या. यामुळे डास दूर होतील.
-एक रिकामे रिफील घ्या. त्याचे झाकण उघडा. मग एका कापराच्या वडीची पूड करून त्यामध्ये घाला. पूड घातलेल्या रिफीलमध्ये तारपीन तेल टाका आणि ते एकत्र करा.
-या रिफीलमध्ये तारपीन तेलाऐवजी कडुलिंबाचे तेलही वापरता येते. कडुलिंबातील अँण्टीबॅक्टेरियल, ऍण्टीफंगल, ऍण्टीव्हायरल गुणधर्मामुळे या तेलातून येणाऱया वासामुळे डास दूर पळतात.
-निलगिरी आणि लिंबाचे तेल समप्रमाणात घेऊन ते अंगाला चोळल्यास डासांपासून रक्षण होते.