
छत्रपती शिवाजी महाराजांसह राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हिकाळी अधिकेशनात कायदा करण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
छत्रपती शिकाजी महाराजांचा काही किकृत प्रकृत्तींकडून वारंवार अवमान केला जात आहे. अशा विकृतींना नेस्तनाबूत करून आपल्या महान राजाचा स्काभिमान आणि सन्मान जतन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करीत असेल, तर त्याच्याकर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी हिवाळी अधिकवेशनात कायदा आणावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंडरूपात प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर
झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल. तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी, तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभारावे. इतिहासात सुसूत्रता आणण्यासाठी एक राष्ट्रीय समिती स्थापन करणे गरजेचे आहे. पुरातत्व सर्वेक्षण आणि पुराभिलेखागार विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्ऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्र, तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक आहे. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयांतून देशात आणण्यासाठी केगाने पावले टाकणे गरजेचे आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
सेन्सॉर बोर्डाला मदतीसाठी समिती नेमा
कलाकृतीच्या निर्मितीकर नियंत्रण ठेकण्यासाठी ‘सेन्सॉर बोर्ड’सारखी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून अनेकदा ऐतिहासिक घटनांच्या दृश्यांमधील कादग्रस्त बाबींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे खोटा इतिहास पसरविला जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सेन्सॉर बोर्डाला मदत करणारी इतिहास संशोधक, अभ्यासक, तसेच तज्ञ यांची एक समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली.


























































