
मालाड पूर्वच्या आप्पा पाडा येथे विद्यार्थ्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मालाडच्या आप्पा पाडा येथे एक सोसायटी आहे. त्या सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर तो विद्यार्थी कुटुंबीयांसोबत राहत होता. बुधवारी दुपारी तो आंघोळ करून बाहेर आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा त्याच्या आईशी किरकोळ वाद झाला. वाद झाल्यावर मुलाने गॅलरीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. विद्यार्थ्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच कुरार पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
























































