सुबोध भावे डोअरकीपरचे काम करणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

नाटक सुरू असताना प्रेक्षकांचे मोबाईल वाजण्याचे प्रकार सर्रास घडतात. मूठभर प्रेक्षकांमुळे इतर प्रेक्षक आणि कलाकारांचेही लक्ष विचलित होते. नाटकातील मोबाईलचा व्यत्यय दूर व्हावा यासाठी चक्क डोअरकीपरचे काम करण्याचा निर्णय संतापलेला अभिनेता सुबोध भावेने घेतला आहे. प्रयोग सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांचे मोबाईल बंद किंवा सायलेंट मोडवर आहेत का, हे तपासणार असल्याचे सुबोधने सांगितले.