निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रीया

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडणाऱ्या डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने दणका देत त्यांना निलंबीत केले आहे. या निलंबनानंतर डॉ. तांबे यांनी प्रथमच प्रतिक्रीया दिली आहे.आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे सांगितले आहे.

मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला कारवाईबाबत समजलं. मात्र,या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही, असे तांबे म्हणाले.

डॉ. तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत मुलगा सत्यजित याचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. कॉँग्रेस हायकमांडने याची गंभीर दखल घेत डॉ. तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. घडलेल्या प्रकाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे शिस्तपालन समितीचे सचिव तारीक अन्वर यांनी म्हटले आहे.