कपिल शर्माची ऑनस्क्रीन बायको अडकणार लग्नबंधनात, मराठी तरुणाशी केला साखरपुडा

कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये त्याची ऑनस्क्रीन बायकोची भूमिका करणारी अभिनेत्री सुगंधा मिश्रा हिने गुपचूप तिचा साखरपुडा उरकला आहे. सुगंधा ही मराठमोठा मुलगा संकेत भोसले याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.


View this post on Instagram

A post shared by (@sugandhamishra23)


सुगंधाने सोशल मीडियावर त्यांचा एक रोमॅण्टिक फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे. तसेच या फोटो सोबतच्या हॅशटॅगवरून तिने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचेही सांगितले. संकेतने देखील त्या दोघांचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत असून इंडस्ट्रीमधील कलाकारांनी देखील त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संकेत भोसले हा देखील विनोदी कलाकार असून त्याने देखील कपिल शर्माच्या शोमध्ये काम केले आहे. त्या व्यतिरिक्तही त्याने अनेक कॉमेजी शोमध्ये काम केलेले आहे. तो सलमान खान व संजय दत्तची उत्तम मिमिक्री करतो

आपली प्रतिक्रिया द्या