
युवासेना माहीम विधानसभा आणि एक्सटेंडर्झ प्रीस्कूल प्रभादेवी यांनी युवासेना मुंबई समन्वयक अभिषेक पाताडे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या छोटय़ा मित्रांसाठीच्या समर कॅम्पची (उन्हाळी शिबीर) सांगता रविवारी मोठय़ा उत्साहात झाली.
या सांगता कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख महेश सावंत, उपविभागप्रमुख कैलास पाटील, उपविभाग संघटक संजय केणी, शाखा समन्वयक चंदन साळुंखे, उपविभाग संघटीका वैशाली पाटणकर, विधानसभा संघटक रेखा देवकर, शाखा संघटक संजना पाटील, युवासेनेचे विधानसभा समन्वयक साईश माने, उपविभाग अधिकारी प्रथमेश बिडू, उपविभाग समन्वयक स्वप्नील माने, उपविधानसभा चिटणीस हर्षल पळशीकर, शाखा अधिकारी विनायक मिठबावकर, शाखा समन्वयक सौरभ भगत, शाखा अधिकारी प्रवीण भाबल, उपशाखा संघटक सिद्धार्थ शिवलकर, विनायक कालेलकर, साहिल कदम, युवती उपविभाग अधिकारी शामल नांगरे, उपविभाग चिटणीस प्राची गावडे, शाखा अधिकारी राजीता वैद्य, शाखा समन्वयक अलिशा गमरे, गीतांजली मोरजकर, वैष्णवी गुरव, करीना शिगवण, रेश्मा चव्हाण, साक्षी भाटकर, अनिल सावंत आदी उपस्थित होते.

























































